पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – शहरात मोठ्या प्रमानात आनंदाने गणेशोस्तव साजरा केला जातो परंतु सध्या नद्यांचे झालेले प्रदुषण व नदी घाटावर विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता शहरात सध्या अस्तित्वात असलेले विसर्जन तलाव हे कमी आहेत तरी गर्दी टाळण्यासाठी व भाविकाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी नविन विसर्जन तलावांच्या निर्मितीची गरज निर्माण झाली. आहे तरी महानगरपालिका प्रशासनाद्वारे लवकरात लवकर शहरांत जास्तीत जास्त ठिकाणी विसर्जन हौद सुख सुविधा पूर्वक बनवून घेण्यात यावे, अशी मागणी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
सदर निवेदन देताना युवक अध्यक्ष शेखर काटे, शहर कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, प्रसन्ना डांगे, तुषार ताम्हाणे, लवकुश यादव, इत्यादीसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.














































