पिंपरीतील जामा मशिदीच्या मुस्लिम बांधवांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार

0
197

“आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, शपथ घेतो की,आम्ही मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ खराळवाडी,पिंपरी येथील जामा मशिदीच्या मुस्लिम बांधवांनी घेऊन १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

  मावळ लोकसभा निवडणूकीचे मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यासाठी २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहेत.

  खराळवाडी येथील जामा मशिद परिसरात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नोडल अधिकारी मुकेश कोळप,प्रफुल्ल पुराणिक यांनी लोकसभा मतदानाबाबत माहिती दिली,यावेळी उपस्थित बांधवांनी मतदानाची शपथ घेतली, मौलाना अझमत खान यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली, यावेळी अखिलभाई मुजावर, अझिज शेख, अमिन शेख, शोएब मुजावर, जैद अकबर शेख, कमल अन्सारी, मुराद खान, जुबेर पटेल,जावेदभाई सय्यद आदी शेकडो बांधव उपस्थित होते.