पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एकास गाडीने उडवण्याचा प्रयत्न

0
195

चाकण , दि.२४ (पीसीबी)- पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने संशयित व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री पावणे दोन वाजता नाणेकरवाडी चाकण येथील विठ्ठल मंदिरासमोर घडली.

महेश जोपा नाणेकर (वय 34, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीला त्याच्या पत्नीसोबत फिर्यादी यांचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्या कारणावरून त्याने त्याची चारचाकी गाडी फिर्यादी यांच्या अंगावर घातली. यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.