पत्नीला पळवून आणल्याच्या संशयातून तरुणावर चाकुने जीवघेणे वार

0
113

वाकड,दि.५ (पीसीबी)

पत्नीला पळवून आणल्याच्या संशयातून एका चिकन विक्रेत्यावर चाकुने जीव घेणे वार करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.3) रात्री काळेवाडी तापकीर मळा चौक येथे घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी साबुर बाबर अली (व 36 रा.

भिवंडी) याला अटक केली आहे. वाकड पोलीस ठाण्यात शहादत सलामत शेख (वय 22 रा काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तापकीर माळा परिसरात पावर चिकन नावाचे चिकनचे दुकान आहे. फिर्यादी येथे काम करत असताना आरोपी तिथे आला. आरोपीच्या पत्नीला फिर्यादी यांनी पळवून आणले आहे, या संशयातून त्याने धारदार चाकूने फिर्यादी यांच्या मानेवर, हातावर, खांद्यावर असे चाकूने वार केले. त्यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले आहेत. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.