नवव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या

0
122

रावेत, दि. १६ (पीसीबी) – इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी रावेत परिसरात घडली. याप्रकरणी 15 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या वडिलांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतीक गंगाधर वाणी (वय 28), गंगाधर नारायण वाणी (वय 50), एक महिला (वय 45, सर्व रा. संगमनेर, अहमदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची मुलगी (वय 23) आणि आरोपी प्रतीक वाणी यांचा 18 एप्रिल 2024 रोजी विवाह झाला. विवाहानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलीकडे हुंड्याची मागणी केली. तू शरीराने बारीक आहेस. तू शिक्षण घेऊ शकत नाहीस, असे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने फिर्यादी यांच्या मुलीने नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.