दौरा रद्द केल्याने मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांवर संतापले

0
300

जालना, दि. १३ (पीसीबी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जालन्यात जावून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडणार होते. तसा दौराही आला होता. परंतु आता त्यांच्या दौऱ्याबद्दल अनिश्चितता निर्माण झालेली आहे. त्यावरुन जरांगे पाटील यांनी खास त्यांच्या शैलीत टिपण्णी केली.

सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी जरांगेंनी समितीसाठी एक महिन्याचा वेळ द्यावा, अशी मागणी केलेली. त्यावर जरांगे यांनी म्हटलं की, खात्रीशीर शब्द दिला आणि मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन शब्द दिला तर उपोषण मागे घेण्यासंदर्भात विचार करु.

त्यानुसार आज मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जालन्याच्या आंतरवाली गावात जावून जरांगे पाटलांचं उपोषण सोडतील, असं सांगितलं जात होतं. तसा दौरादेखील आलेला होता. मात्र आता ऐनवेळी मुख्यमंत्री येणार नसल्याची माहिती मिळत आहे.