दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यूसहप्रवासी गंभीर जखमी

0
101

बावधन, दि. 4 (पीसीबी)

दुचाकी घसरून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. तर दुचाकी वरील सहप्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 3) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बावधन येथे घडला.

विशाल पिल्ले (रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. तर हरजीतसिंग जग्गासिंग गिल असे जखमी सहप्रवाशाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल पिल्ले आणि हरजितसिंग हे मुंबई बेंगलोर महामार्गावरून दुचाकीने जात होते. बावधन येथील टोयोटा शोरूम जवळ आल्यानंतर पिल्ले यांची दुचाकी घसरली. त्यामुळे अपघात झाला. या अपघातात पिल्ले यांचा मृत्यू झाला. तर सहप्रवासी हरजीतसिंग हे गंभीर जखमी झाले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.