दादा, एकाचे लिंग कापले म्हणजे गुलाबी कपडे घालण्याची वेळ येणार नाही… महिला नेत्याच्या विधानाने खळबळ

0
95

यवतमाळ, दि. ०५ (पीसीबी) : भाजपाच्या अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत, असं म्हणत या नेत्यांची यादीच काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी दाखवली. शिवाय यातील एकाचे जरी अजित पवार यांनी लिंग कापले तर गुलाबी कपडे घालण्याची वेळ येणार नाही, असंही संध्या सव्वालाखे म्हणाल्या आहेत. त्या यवतमाळमध्ये बोलत होत्या. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार महिला अत्याचाराबाबत भाष्य केलं होतं. चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्यांचे सामान कापलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आज संध्या सव्वालाखे यांनी आज अजित पवार यांना टोला लगावत हे वक्तव्य केलं आहे.

तुम्हाला कुणीतरी सांगितले गुलाबी कपडे घाला महिला मतदान करतील
संध्या सव्वालाखे म्हणाल्या, महिलांना कळले आहे की, तुम्ही जुलमी आहेत म्हणूनच गुलाबी गाड्या, गुलाबी कपडे घालून फिरत आहेत. तुम्हाला कुणीतरी सांगितले गुलाबी कपडे घाला महिला मतदान करतील. एखाद्याचे लिंग कापले तर तसेच महिला आपल्याला मतदान करतील. आरोपींना पाठीशी घालण्याचे काम करीत आहे.

इकडे पूर परिस्थिती; भाजपचे आमदार डान्स करण्यात गुंग आहेत; हीच भाजपची संस्कृती- संध्या सव्वालाखे
उमरखेड भागात भयावह पूरस्थिती असताना भाजपचे आमदार डॉ. संदीप धुर्वे नाचण्यात गुंग आहेत. हीच भाजपची संस्कृती आहे. नैतिकता नावाची गोष्ट ही भाजपमध्ये नाही. निर्लज्ज आणि महिलांच्या विरोधी सरकार आहे. अशी टीका महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली. ज्या भागात पूरस्थिती आहे आणि आमदार नाचत असेल तर जाब कोणी विचारायचा. गौतमी पाटील ही पोटासाठी नाचली पण तुम्ही जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नाचले आहे. याला जनताच मतदानातून उत्तर देईल, असंही सव्वालाखे म्हणाल्या.