पिंपरी, दि.10 (पीसीबी) भोसरी,
अधिकचे पैसे कमावण्याचा मोह एका व्यक्तीला चांगलाच अंगलट आला आहे. दररोज 15 टक्के परतावा मिळेल असे व्यक्तीला आमिष दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून व्यक्तीने 55 लाख 51 हजार 342 रुपये गमावले आहेत. हा प्रकार 17 एप्रिल ते 26 जून या कालावधीत मोशी येथे ऑनलाईन माध्यमातून घडला.
8294511431 क्रमांकावरून बोलणारा आदित्य सक्सेना, 9258704941 क्रमांकावरून बोलणारी महिला आर्या सिंह अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 37 वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांना स्टॉक ट्रेडिंगद्वारे गुंतवणूक केल्यास त्या गुंतवणुकीच्या रकमेवर दररोज 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 55 लाख 51 हजार 342 रुपये घेतले. त्या रकमेवर त्यांना दोन कोटी 77 लाख 98 हजार 152 रुपये परतावा मिळेल असे दाखवण्यात आले. मात्र त्यांना परतावा आणि गुंतवणूक केलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.











































