तडीपार आरोपीची तरुणास बेदम मारहाण

0
124
crime

दि. ७ ऑगस्ट (पीसीबी) वाकड,
तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्‍या सराईत गुन्‍हेगार आणि त्‍याच्‍या साथीदाराने तरुणास सिमेंटच्‍या गट्‌टुने बेदम माहरण केली. ही घटना रविवारी (दि. ४) छत्रपती चौक, रहाटणी येथे घडली.

कुंदन राजेद्र वाघ (वय ३३, रा. भारत कॉलनी, नखाते वस्ती, रहाटणी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत मंगळवारी (दि. ६) वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. सौरभ विकास साठे (वय २२, रा. रायगड कॉलनी नखाते वस्ती, रहाटणी), अमर विलास साळवे (वय १८, रा. गणराज कॉलनी, रहाटणी), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसंनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून दुचाकीवर येऊन फिर्यादी कुंदन याच्‍या समोर गाडी थांबविली. आरोपी सौरभ याने कुंदन याचा मित्र प्रशांत प्रकाश शिंदे याचा मोबाइल नंबर मागितला. मात्र माझ्याकडे त्याचा मोबाइल नंबर नाही, असे फिर्यादी यांनी सांगितले. या कारणावरून चिडलेल्‍या आरोपीने “तुला लय माज आला आहे का, असे म्हणुन फिर्यादीस लाथा बुक्यांनी मारहाण केली. तेव्हा फिर्यादीच्या मित्रांनी मध्यस्थी केली. त्‍यावेळी आरोपी अमर याने फिर्यादीचे मित्रांना शिवीगाळ करुन मध्ये कोणी आला तर तुम्हालाही सोडणार नाही, अशी धमकी दिली. आरोपी सौरभ याने रोडवर पडलेला सिमेंटचा गड्डू उचलून फिर्यादी कुंदन याच्‍या डोक्यावर, डाव्या डोळयाचे वर मारुन गंभीर जखमी केले आहे.

आरोपी सौरभ साठे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी संपूर्ण पुणे जिल्‍ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. मात्र तो कोणतीही परवागनी न घेता शहरात आला व त्‍याने आणखी एक गुन्‍हा केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.