टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
74

भोसरी, दि. ११ (पीसीबी)

टेम्पोच्या पाठीमागील बाजूला काम करत असलेल्या एका व्यक्तीला टेम्पोची धडक बसली. यामध्ये व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना 21 ऑगस्ट रोजी गव्हाणे वस्ती, भोसरी येथे घडली.

रौफ जलील चौधरी असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अहमद रौफ चौधरी (वय 23, रा. टेल्को रोड, भोसरी. मूळ रा. उत्तर प्रदेश) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 14/सीपी 0817) चालक राजू रामसेवक यादव (वय 37, रा. पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील रौफ चौधरी हे काम करत होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो निष्काळजीपणे रिवर्स घेतला. त्यामध्ये चौधरी हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.