चिंचवड, दि. 27 (पीसीबी) : टेलिग्राम टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची 12 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत बिजलीनगर चिंचवड येथे घडली.
अमन अनिल चव्हाण (वय 32, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निता, लीसा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना टेलिग्राम टास्कद्वारे जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून 12 लाख 57 हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.











































