टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

0
155

दुचाकी वरून रस्ता ओलांडत असताना पाण्याच्या टँकर ने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.20) मोशी प्राधिकरण येथे पुणे नाशिक महामार्गावर झाला.

याप्रकरणी जहांगीर लिकायत अली विश्वास (वय 31 रा थेरगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पाण्याचा टँकर चालक दत्तात्रय भाऊराव जगदाळे (व 58 रा.चाऱ्होली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तरी अपघातात राजू लीकायत अली विश्वास (वय 26) याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फिर्यादी यांचा भाऊ राजू हे दुचाकीवरून रस्ता व ओलांडत होते.यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील टँकर भरधाव वेगाने आणून थेट राजू यांच्या दुचाकीला धडकवला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने राजू यांचा जागीच मृत्यू झाला. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.