झाडास धक्का लागल्याने बेदम मारहाण

0
104

दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) वाकड,

घरासमोरील झाडाला टेम्पोचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन जणांनी व्यावसायिकास लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 3) सायंकाळी काळाखडक, वाकड येथे घडली.

संस्कार शिंदे (वय 18) आणि शंतनु नरेंद्र शिंदे (वय 22, रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, काळाखडक, वाकड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मनिष कामताप्रसाद सिंग (वय 46, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना व्यावसायासाठी लागणारे व्हिनायल रोड घेऊन टेम्पो आला. या टेम्पोचा धक्का आरोपी यांच्या घरासमोरील पारिजातकाच्या झाडाला लागला. या कारणावरून चिडलेल्या आरोपी संस्कार याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपी शंतनु याने लाकडी दांडक्याने मारहाण करीत फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या पोटरीचे हाड, डाव्या हाताचे मधले बोट फॅक्चर करून डाव्या पायाच्या अंगठ्याला इजा पोचविली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.