जुन्या सांगवीत दोन एटीएम फोडले; चोरट्यांच्या हाती लागले अवघे 1900 रुपये

0
284

सांगवी, दि. २६ (पीसीबी) – जुनी सांगवी येथे एसबीआय बँकेचे एटीएम दोन चोरट्यांनी फोडले. मात्र या दोन्ही एटीएम मधून चोरट्यांना अवघे 1900 रुपये हाती लागले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी घडली.

रोहित विजय बहादूर सिंग (वय 23, रा. उत्तर प्रदेश) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बलभीम संपत जाधव (वय 40, रा. चिखली) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी मधील राधानगर येथे एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास दोन चोरटे एटीएम मध्ये आले. त्यांनी स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने एटीएमचे कॅश शटर तोडले. त्यानंतर आरोपींकडे असलेल्या लोखंडी पट्टीच्या सहाय्याने मशीन मधील रोख रक्कम चोरली. मात्र यामध्ये चोरट्यांच्या हाती अवघे 1900 रुपये लागले. यात दोन्ही मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.