हिंजवडी, दि. 04 (पीसीबी) : जिममध्ये व्यायाम करताना माण गाव येथील प्रसिध्दी पैलवान विक्रम पारखी (वय-३०) याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. त्याच्या मागे वडिल माजी सैनिक शिवाजीराव पारखी, एक थोरला भाऊ आणि एक बहिण असा परिवार आहे. पैलवान पारखी याचे १२ डिसेंबरला लग्न होणार होते मात्र, काळाने त्यापूर्वीच झडप घातली आणि एक नामांकित कुमार महाराष्ट्र केसरी हरपला.
मुळशी तालुक्यातील माण गावचा विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरले आणि मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर रोजी वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद आयोजित कुमार कुस्ती स्पर्धेत त्याने हा विक्रम केला होता. नंतरच्या काळात त्याने अनेक कुस्त्यांधून पदके मिळविली. एक आदर्श, गुणी खेळाडू म्हणून त्याची ख्याती होती. झारखंड राज्याची राजधानी रांची येथे कुस्तीस्पर्धेत त्याला ब्रान्झ पदक मिळाले होते. हिंदकेसरी अमोल बुचडे यांच्याशी त्याचे गुरु-शिष्याचे नाते होते.
धक्कादायाक प्रकार म्हणजे विक्रम याचा १२ डिसेंबरला लग्नसोहळा असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, सकाळी अचानक ही खबर आल्याने पाऱखी कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला.
            
		











































