जावयाकडून सासऱ्याला कोयत्याने मारहाण

0
378

भोसरी, दि. १८ (पीसीबी) – जावयाने सासऱ्याला कोयत्याने मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री एमआयडीसी भोसरी येथे घडली.

सीताराम नागोराव पवार (वय ४०, रा. एमआयडीसी भोसरी) असे जखमी सासऱ्याचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल बाळू पवार (वय ३०, रा. वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या भावाचे भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून फिर्यादी यांचा जावई राहुल याने फिर्यादीस कोयत्याने पायावर मारून पाय फ्रॅक्चर केला. हातावर कोयत्याने मारून त्यांना गंभीर जखमी केले. कोयत्याने मोबाईल फोडून त्याचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.