अभियंता तरुणाची ऑनलाइनद्वारे ९ लाख ७४ हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार पिंपरीतील नेहरूनगर येथे १६ मार्च ते २४ मार्च २०१४ या कालावधीत घडला.
नेहरूनगर येथील २७ वर्षीय एका अभियंत्याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी फिर्यादीला एका लिंकमध्ये जॉईन करून घेतले. एका कंपनीच्या लॉगिन पेजवर जावून टास्क देत टास्क कम्प्लिट करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादी याना जास्त पैशाचे आमिष दाखवून कंपनीने दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन इंटरनेटचा वापर करून ९ लाख ७४ हजार रुपये पाठवले. मात्र, नंतर फिर्यादी याना पैसे परत न देता आणखी पैशाची मागणी करून फिर्यादीची फसवणूक केली. पोलीस निरीक्षक धनंजय कापरे तपास करीत आहेत.












































