जांबे चौकात एकावर चाकूने वार

0
106

हिंजवडी, दि. ०२ (पीसीबी) : मुळशी तालुक्यातील जांबे येथे दोघांनी मिळून एका व्यक्तीवर चाकूने वार केले. यामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास समाधान हॉटेल समोर जांबे चौक येथे घडली.

जुबेर उर्फ मुन्ना मोला अत्तार (वय 34, रा. जांबे, ता. मुळशी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी जुबेर यांच्या पत्नीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमनाथ सातव, तुषार गायकवाड (दोघे रा. जांबे, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुबेर आणि त्यांच्या पत्नी चिकन घेण्यासाठी आणि मेडिकल दुकानातून औषधे घेण्यासाठी जांभे चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. अज्ञात कारणावरून आरोपींनी जुबेर यांच्या गळ्यावर, डोक्यावर, तोंडावर आणि हातावर चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.