चालत्या स्कुल व्हॅनमध्ये चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

0
90

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) पुणे : पुण्यातील एका नामांकित कॉलेजमधील दोन अल्पवयीन मुलींवर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना ताची असतानाच आज पुन्हा चालत्या स्कुल व्हॅनमध्ये चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सध्या बदलापूरमधील घटनेने राज्य ढवळून निघालेले असतानाच पुण्यामधून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्हॅन चालक सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये लैंगिक अत्याचार करत होता.एकीकडे बदलापूरमधील लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्याचा इन्काउंटर झालेला असताना पुण्यात आता खळबळजनक घटना घडलेली आहे. या घटनेनंतर पुणेकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.पुण्यातील वानवडी परिसरात हा धकादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जेटिंग रेड्डी (वय 45, राहणार वैदवाडी हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुल व्हॅन चालक आरोपी संजया हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना स्कुल व्हॅन मधून शाळेत सोडण्याचे काम करत असतो. या आरोपीच्या स्कुल व्हॅन दोन्ही पीडित चिमुरडींना पुढच्या सीटवर बसवण्यात येत होते. आरोपी चालवत असलेल्या स्कुल व्हॅन दोन्ही मुलींना जवळ बसवून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाचता कुठे केली तर धमकी सुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या चार दिवसांपासून आरोपी अत्याचार करत होता. दरम्यान, अल्पवयीन मुलगी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट ठिकाणी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याबाबत विचारपूस केली असता आरोपीने संजय याने केलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आपल्या आईला सांगितला त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.