गाडी विकण्याच्या बहाण्याने तीन लाखांची फसवणूक

0
340

पिंपरी ,दि.०७(पीसीबी) – गाडी विकत देतो असे सांगून पैसे घेऊन आरोपी पसार झाला. ही घटना फेब्रुवारी-मार्च 2022 ते 6 नोव्हेंबर 2023 या कालावधीत वाकड येथे घडली.

मनोहर दीपचंद पाटील (वय 47, रा. वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रवण अर्जुन नारायण शुक्ला (रा. प्रभादेवी, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील यांचे मित्र चित्राम जनार्दन रणविरकर यांचा मेहुणा रामकृष्ण चंद्रकांत इंदुरकर यांना गाडी घ्यायची होती. या व्यवहारात पाटील आणि आरोपी श्रवण यांची ओळख झाली. इंदुरीकर यांच्या वतीने पाटील यांच्याकडून श्रवण याने एक लाख 41 हजार रुपये घेतले. त्यानंतर पाटील यांचा मित्र प्रदीप चव्हाण यांना देखील गाडी देतो असे सांगून श्रवण याने एक लाख 42 हजार 500 रुपये घेतले. त्यानंतर श्रवण पसार झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.