केवळ शंभर रुपयांत मेट्रोचा दोन्ही मार्गांवर अमर्यादीत प्रवास

0
151

पुणे शहरात मेट्रोचे दोन मार्ग सुरु झाले आहेत. नेहमी वाहतूक कोडींत अडकणारे पुणेकर मेट्रो प्रवाशाला भरभरुन प्रतिसाद देत आहेत. पुणेकर मेट्रोने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. पुणे मेट्रो सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहेत. पुणेकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मेट्रो प्रशासनही नवनवीन सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पुणे मेट्रोने दैनंदिन पासची सुविधा निर्माण केली आहे. त्यानुसार दिवसभरात केवळ शंभर रुपयांत दोन्ही मार्गांवर अमर्यादीत प्रवास करता येणार आहे. त्यामुळे पुण्यातून पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवडमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची चांगली सुविधा होणार आहे.

प्रवाशांना या दिल्या जात आहेत सुविधा
मेट्रोने दर महिन्याला लाखो पुणेकर प्रवास करत आहेत. मार्च महिन्यात २२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी मेट्रोने प्रवास केला. पिंपरी- चिंचवडमधून पुणे स्टेशन, येरवडा, वनाजपर्यंत मेट्रोने जात येते. या मार्गावर रस्ते मार्गाने जाताना तास, दोन तासांचा वेळ जातो. परंतु मेट्रोने जवळपास अर्धा तासांत प्रवास होते. यामुळे मेट्रोने प्रवास करण्यास पुणेकर प्राधान्य देऊ लागले आहे. त्यामुळे मेट्रोकडून ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट सुविधा, अॅप, मेट्रो स्थानकावर मशीनच्या माध्यमातून तिकीट दिले जात आहे.

दिवसभरात पासची सुविधा
स्मार्ट कार्ड, मासिक पास मेट्रोकडून प्रवाशांना दिला जात आहे. आता त्यासोबत प्रवाशांना शंभर रुपयांना दैनंदिन पासची सुविधा सुरु केली आहे. त्यामध्ये त्या दिवसभरात अमर्यादीत प्रवास करता येणार असल्यामुळे प्रवाशांचा आर्थिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ही पास दोन्ही मार्गांवर वापरता येणार आहे. सकाळी सहापासून रात्री दहा वाजेपर्यंत या पासची वैधता राहणार आहे.