किराणा सामान घेण्यासाठी आलेल्या ग्राहकास बेदम मारहाण

0
223

पुणे, दि. ५ (पीसीबी) – किराणा सामान घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला दुकानदाराने बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री महाळुंगे येथे घडली.

प्रशांत अशोक होसमाने (वय 32, रा. महाळुंगे, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्री गणेश सुपर शॉपी येथील दोन अनोळखी इसम, न्हावीच्या दुकानातील एक अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रशांत हे महाळुंगे येथील श्री गणेश सुपर शॉपी मध्ये किराणा सामान आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी किराणा मालाच्या दुकानाचा मालक, त्याचा भाऊ व दुकाना शेजारी असलेल्या न्हावीच्या दुकानातील एका व्यक्तीने जुन्या भांडणाच्या कारणावरून तसेच किराणा सामान घेण्याच्या कारणावरून प्रशांत यांना मारहाण केली. प्रशांत आणि त्यांचा पुतण्या यांना शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण केल्याने दोघेजण जखमी झाले आहेत. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.