कारची टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक

0
36

चाकण, दि. 29 (पीसीबी) : मद्यप्राशन केलेल्‍या कार चालकाने कारची टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला धडक दिली. हा अपघात चाकण जवळील मुटकेवाडी चौक येथे गुरुवारी मध्‍यरात्री साडेबारा वाजताच्‍या सुमारास घडला.

निवृत्ती शिवाजी भिसे (वय ३६, रा. गोपाळपुडा रोड, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) यांनी गुरुवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. राजन सुरेश मेनन (वय ३१, रा. सहकार नगर, पुणे) याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी राजन मेनन याने दारू पिऊन (एमएच १२ एक्सई ६९३७) कार चालविली. या कारने फिर्यादी यांच्‍या टेम्‍पो ट्रॅव्‍हलरला जोरदार धडक दिली. आरोपीच्‍या या कृतीमुळे फिर्यादी व इतरांचा जीव धोक्‍यात आला. तसेच टेम्‍पो ट्रॅव्‍हलरचेही नुकसान झाले. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.