कामगारांच्या प्रश्नावर राज्यव्यापी बैठक घेण्याची मागणी

0
303

पिंपरी दि. ९ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रातील कष्टकरी कामगारांची, त्यांचे विविध प्रश्नावर कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राज्यव्यापी बैठकीचे मुंबईत आयोजन करावे, अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

कामगारांच्या प्रश्नावर लवकरच बैठक घेण्याचे आश्वसन मंत्री पाटील यांनी दिले. विविध प्रकारच्या कष्टकरी कामगारांच्या अनेक मागण्या बाबत चर्चा करून कामगार मंत्री व संबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे, असे नखाते यांनी म्हटले आहे.

यावेळी नुकतीच महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्न तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. अभ्यासू नेतृत्वास हि जाबबदारी दिल्यामुळे सीमाप्रश्नाला चालना मिळण्यास मदत होणार आहे.