कातवी मधून ऑफिस कंटेनर चोरीला

0
169

कातवी येथून ऑफिस कंटेनर चोरीला गेले. ही घटना शनिवारी (दि. 17) सकाळी उघडकीस आली. नईम इसाकभाई मुलाणी (वय 34, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलाणी यांनी कातवी येथे ऑफिस कंटेनर ठेवले होते. गुरुवारी (दि. 15) सकाळी नऊ ते शनिवारी (दि. 17) सकाळी 11 वाजताच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने दीड लाख रुपये किमतीचे ऑफिस कंटेनर चोरून नेले. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.