काँग्रेसचे नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

0
106

सातारा, दि. १९ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या 90 व्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज (रविवारी) पहाटे निधन झाले. सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी तीन वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या.