सांगवी, दि. ३० (पीसीबी) – ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास 40 टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन दोघांनी एका व्यक्तीची 23 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑगस्ट 2022 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीत नवी सांगवी येथे घडली.
रणजित महादेव ढोमसे (वय 40, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहन शहा, राहुल मेहरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास त्यावर त्यांना 40 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्यांना टप्प्याटप्प्याने 23 लाख रुपये गुंतवणूक करण्यास आरोपींनी भाग पाडले. त्यांनतर फिर्यादींना कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.











































