पिंपरी, दि. २६ (पीसीबी) – भोसरी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी विशाल माने यांनी राहत्या घरी बेडरुमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकिस आले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मूळचे कोरेगाव तालुका (सातारा जिल्हा) येथील रहिवासी असलेले माने हे अवघ्या दहा वर्षांपूर्वी म्हणजे २०१३ मध्ये पोलिसांत भरती झाले होते. पत्नी माहेरी गेलेली असताना त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. कौटुंबिक वादातून हा प्रकार झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे . २०१९ मध्ये त्यांचे लग्न झाले आणि त्यांना लहान तीन वर्षांचा मुलगा आहे











































