पुणे, दी. २८ (पीसीबी): स्पोर्ट्स एअर गनमधू गोळीबार करीत एका पाळीव श्वानाला विकलांग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये भादवि कलम ४२८, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २१ नोव्हेंबर २०२३ रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रुक येथील किरण इन्कलेव्ह लोकमंगल सोसायटीमध्ये घडला.
अली रियाज थावेर (जीएच कॉम्प्लेक्स, झेड कॉर्नर, मांजरी बुद्रुक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी प्रीती विकास अग्रवाल (वय ४६, किरण इनक्लेव्ह, लोकमंगल सोसायटी, मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्रवाल यांनी एक श्वान पाळलेले होते. तिचे नावबाऊंसी असे आहे. २१ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे श्वान सोसायटी समोरील रस्त्यावर बसलेले होते. यावेळी आरोपी अली याने त्याच्याकडे असलेल्या स्पोर्ट्स गनने तिच्यावर गोळीबार केला. त्यामुळे या श्वानाला गंभीर इजा झाली. तिच्यावर उपचार करण्यात आले. छर्रा लागल्याने श्वान विकलांग झाल्याचे असे फिर्यादीत नमूद करण्यात आले












































