उजनी धरणात बुडालेल्या सहा पैकी पाच जणांचे मृतदेह सापडले

0
88

उजनीत बोड बुडून मंगळवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत बोटीतील ६ प्रवासी बुडाले होते. बुधवारी 18 तासांच्या शोधकार्यानंतर बोट ३५ फूट खोल तळाला सापडली मात्र मृतदेह सापडले नव्हते. त्यानंतर रात्री शोधकार्य थांबवण्यात आलं.

उजनीतून गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आलं. त्यावेळी मोठी अपडेट समोर आली आहे. बुडालेल्या सहा पैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप एकाचा शोध सुरू आहे. भीमा नदीत बुडालेल्या सहापैकी पाच जणांचा तपास लागला. तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले.

मृतदेह ताब्यात घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झालं आहे. मृतदेहांची ओळख पटवली जाणार आहे. आणखी तिघांचा शोध सुरू होता. उजनी जलाशयात बुडालेल्या ६ पैकी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पाच जणांचे मृतदेह सापडले, दोन लहान मुले दोन पुरुषांचा आणि एका महिला समावेश आहे.
गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०), कोमल गोकूळ जाधव (वय २५), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय ३, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय ३५) व गौरव डोंगरे (वय १६), अशी बोट उलटून बुडाल्यांची नावे आहेत.

आज पुन्हा एनडीआरएफकडून शोध मोहीम राबवण्यात आली. काल हाती घेतलेल्या शोध मोहिमेत बुडालेली लाँच सापडली होती. घटनास्थळी 35 फूट पाण्याखाली एका खडकावर अडकली होती. तिथं चप्पल, पर्स, हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या होत्या.

उजनी धरण पात्रात मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वारा सुटला होता. या वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळाशी हून सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातल्या कुगावकडे ही बोट जात होती. वाऱ्याचा वेग वाढल्यामुळे बोट उलटी झाली, या बोटीमधले पाच जण बुडाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती.