आयपीओ खरेदी-विक्रीच्या बहाण्याने नागरिकाला 40 लाख रुपयांचा गंडा

0
102

रावेत, दि. 2 ऑगस्ट (पीसीबी) – ॲपद्वारे शेअर मार्केट व आयपिओ खरेदी-विक्रीच्या बहाण्याने एका 43 वर्षीय नागरिकाला चाळीस लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ही फसवणूक 5 जुलै ते 12 जुलै 2024 या कालावधीत रावेत येथे घडले आहे.या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.1) फिर्याद दिली. यावरून शिवांगी अग्रवाल या अज्ञात महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना मोबाईलवर लिंक पाठवून आरोपीने ग्लोबल सिक्युरिटी ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले व त्याद्वारे शेअर तसेच ipo खरेदी विक्रीच्या बहाण्याने त्यांचा विश्वास संपादन केला व फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी असे 40 लाख दोन हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केली. यावरून रावेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.