आयपीएल सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या सहा जणांना अटक

0
468

हिंजवडी,दि.२२(पीसीबी) -आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या एका टोळीचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने पर्दाफाश केला आहे. नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यातील सहा जणांना अटक केली आहे. आरोपींकडून चार लाख 81 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मारुंजी रोड हिंजवडी येथे करण्यात आली.

वैभव बाबाराम डिक्कर (वय 28, रा. अकोला), सचिन गंगाराम आजगे (वय 23, रा . धुळे), विकास कैलास लेंढे (वय 22, रा. राहु पिपळगांव पो. कोरेगाव ता. दौड, जि. पुणे), ओमकार बिरा भांड (वय 20, रा. राहु पिपळगांव पो. कोरेगाव, ता. दौड, जि. पुणे), आशिष निरांजण देशमुख (वय 28, रा. अकोला), महेश परमेश्वर काळे (वय 33, रा. अकोला) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह राम भानुशाली, विकास रायसिंग चव्हाण, प्रकाश भगवानदास तेजवाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी रोड हिंजवडी येथे एका सोसायटीमध्ये काहीजण कोलकाता नाईट रायडर्स लखनऊ सुपर जॉइंट्स आयपीएल क्रिकेट मॅच वर ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, तेरा मोबाईल फोन, एक वाय फाय, चार नोटबुक असा एकूण चार लाख 81 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, विजय कांबळे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाट, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस अंमलदार नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.