अवैध दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्‍हा

0
35

चिंबळी, दि. 29 (पीसीबी) : अवैध दारू विक्री केल्‍याप्रकरणी पोलिसांनी एकावर गुन्‍हा दाखल केला आहे. ही घटना चाकण जवळील चिंबळी फाटो येथे घडली.

रमाकांत शांताराम सोनवणे (वय ३०, रा. पद्‌मावती रोड, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. मालामत्‍ता गुन्‍हे विरोधी पथकातील पोलीस हवालदार समीर लक्ष्‍मण रासकर यांनी गुरुवारी (दि. २८) याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चिंबळी फाटा येथील हॉटेल अस्‍सल गावरानच्‍या पाठीमागील बाजूस पत्राशेडमध्‍ये आरोपी रमाकांत सोनवणे हा अवैध दारू विक्री करीत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी छापा घातला. आरोपीच्‍या ताब्‍यातून सात हजार ६७५ रुपये किमतीच्‍या देशी, विदेशी दारूच्‍या तसेच बिअरच्‍या बाटल्‍या जप्‍त केल्‍या. चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.