अवधुत गुप्तेंच्या हस्ते रविवारी होणार पिंपरी चिंचवड आयडॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण

0
126

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड आयडॉल २०२४ मोरया करंडक या स्पर्धेची महाअंतिम फेरी रविवार (दि. १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती हर्षवर्धन भोईर यांनी दिली.

पिंपरी चिंचवड आयडॉलचे हे ९ वे पर्व आहे. आकुर्डीतील ग. दी. माडगुळकर नाट्यगृहात ही महाअंतिम फेरी संपन्न होणार आहे. या महाअंतिम फेरीनंतर सायंकाळी साडेपाच वाजता या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या स्पर्धेत ९ ते १५ आणि १६ ते ३५ या दोन वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सुमारे ३०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. दोन्ही गटातील प्रथम विजेत्यांना प्रत्येकी २१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे.