अल्पवयीन मुलांना मारहाण करत कोयत्याने केले वार दोघांना अटक

0
279

दि २० मे (पीसीबी ) – अल्पवयीन मुलांना मारहाण करत एकच डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि.19) पिंपरी येथे घडली या प्रकरणी पिंपरी पोलीस आणि दोघांना अटक केली आहे.

सेलविंग राजू नायडू (वय 20 रा काळेवाडी) , अभिषेक महेश देशिंगकर (वय 25 रा पिंपरी) यांना अटक केली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ तसेच चुलत भाऊ हे मोबाईलवर गेम खेळत होते. यावेळी आरोपी दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीवर कुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.