अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्र्म्प यांच्या धाकट्या भावाचे निधन

0
237

न्यूयॉर्क, दि. १७(पीसीबी) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ट ट्र्म्प यांच्या धाकट्या भावाचे निधन झाले. अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी संध्याकाळी रॉबर्ट ट्रम्प यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

व्हाईट हाऊसने परिपत्रक काढून रॉबर्ट ट्रम्प यांच्या निधनाची दु:खद वार्ता दिली. रॉबर्ट ट्रम्प यांनी 26 ऑगस्टला वयाची 72 वर्षे पूर्ण केली असती, मात्र अवघ्या दोन आठवड्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.