अत्‍याचारास विरोध करणार्‍या तरुणीस मारहाण

0
145

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

लग्‍नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्‍यात आला. या अत्‍याचारास विरोध करणार्‍या तरुणीला मारहाण करण्‍यात आली. ही घटना पिंपरी येथे घडली.

पंकज सिद्धार्थ बोदडे (वय ३०, रा. जाफ्रापूरवाडी, अदमपूर, ता. तेल्‍हार, जि. अकोला) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३० वर्षीय तरुणीने सोमवारी (दि. २) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ही घटना २०२२ ते जून २०२४ या कालावधीत पिंपरी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी बोदडे याने पिडित तरुणीला लग्‍नाचे अमिष दाखवत तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केला. या अत्‍याचाराला तिने विरोध केला असता तिला हाताने माहरण केली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.