अजंठानगर येथे दोन टोळक्यांमध्ये राडा

0
634

निगडी, दि. ११ (पीसीबी) – निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजंठानगर येथे दोन टोळक्यांनी आपसात भांडण करत परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री घडली.

रोहित दत्तात्रय गायवाड (वय 21, रा. अजंठानगर, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकाश ब्रह्मदेव नरुटे (वय 22), सुहास उर्फ गोट्या बाबासाहेब माने (वय 22), अभिषेक नाना कांबळे (वय 18), चेतन दत्तात्रय गायकवाड (सर्व रा. तक्षशिला हाउसिंग सोसायटी, अजंठानगर, निगडी), ओंकार अशोक गबाळे आणि तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी आपसात संगनमत करून विनाकारण फिर्यादी रोहित गायकवाड यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच रोहित यांचे मित्र विशाल शिंदे, अनुराग पाटोळे यांना सिमेंटचे गट्टू आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे रोहित यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात बाबासाहेब वैजनाथ सरवदे (वय 53, रा. अजंठानगर, निगडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुटल्या उर्फ अनुराग सतीश पाटोळे, विशाल सुरेश शिंदे, प्रफुल्ल त्रंबक गायकवाड, रोहित दत्तात्रय गायकवाड (सर्व रा. अजंठानगर, निगडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी आपसात संगनमत करून हातात कोयते व दांडके घेऊन फिर्यादी बाबासाहेब यांच्या सोसायटीत आले. त्यांनी कोयता हवेत फिरवून शिवीगाळ करत नागरिकांना दमदाटी केली. आज एकाचा तरी मर्डर करत असतो, असे म्हणत दहशत पसरवली. त्यानंतर सोसायटीच्या खाली पार्क केलेली रिक्षा आणि इतर पाच वजनांची तोडफोड केली. आरोपी विशाल याने फिर्यादीच्या दिशेने कोयता फेकून मारला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.