पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले

0
3

दिल्लीमध्ये भारत अभिमानाने प्रतिष्ठित ग्लोबल AI समिटचे आयोजन करत आहे. जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नेते आणि इनोव्हेटर भारतात आले आहेत. हा देशासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे.

परंतु या आनंदाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटच्या ठिकाणी घुसखोरी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार भारत सरकारची बदनामी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची प्रतिमा खराब करण्यासाठीच केल्यासारखा दिसतो.

AI आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जगभर ओळख वाढत असताना, अशा प्रकारचे वर्तन चुकीचा संदेश देते. जग भारताला तंत्रज्ञान क्षेत्रातील महासत्ता म्हणून पाहत आहे. अशा वेळी प्रचंड महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात अडथळे निर्माण करणे अत्यंत दुर्दैवी आहे.

ही कृती फक्त टीका नव्हती, तर जाणीवपूर्वक देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होता. राजकारण करायचे असेल तर ते देशाच्या प्रतिमेच्या किंमतीवर नसावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या तरुण पिढीला काय संदेश जातो? आज युवक स्टार्टअप्स, इनोव्हेशन आणि टेक्नोलॉजीच्या माध्यमातून भारताला पुढे नेत आहेत. त्यांच्यासमोर गोंधळ आणि घुसखोरीचे उदाहरण ठेवणे योग्य नाही. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण अव्यवस्था असू नये.

भारताची प्रगती थांबवता येणार नाही. जग भारतासोबत उभे आहे. कोणतीही नकारात्मकता देशाच्या तांत्रिक स्वप्नांना थांबवू शकत नाही.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि राहुल गांधींनी हे समजून घ्यावे की अशा गोंधळामुळे तुमची सडकी मानसिकता तरुणाईसमोर उघड होते आहे.

आजची यंग इंडिया सर्व काही पाहत आहे. काहीही सकारात्मक काम न करता फक्त मोदीजींवर टीका करणे हाच काँग्रेस आणि राहुल गांधींचा एकमेव अजेंडा राहिला आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

देशाच्या प्रगतीला पाठिंबा देण्याऐवजी आंतरराष्ट्रीय मंचांवर गोंधळ घालून भारताची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे.

या सर्व कृतीच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या निषेधार्थ पिंपरी येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे , भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव , शहर समन्वयक अजित कुलथे , शहर सरचिटणीस उदय गायकवाड , राहुल खाडे , प्रसाद कस्पटे , सुमित घाटे , दिनेश काटे , सम्यक साबळे , साची दोशी , युवा मोर्चा उपाध्यक्ष देवयानी भिंगारकर , अतुल बोराटे, मयूर काळभोर, उमेश सांडभोर , सागर घोरपडे, आदम मुलानी , अभिजीत बागुल, मनोज घोडेकर, विशाल वाघेरे, राजेश चौधरी , रवी भिलारे, दीपक शिंदे, साईराज भालेकर, सुशांत पवार, अमीर शेख, गौरव शिरुडे, आशिष राऊत, निखिल शहाणे, जयदीप करपे, शैलेश स्वामी, विजय पवार, ओमकार पवार, प्रतीक भालेराव, अथर्व देवके , आकाश वाळके, रवी पारखे ,अतुल काळोखे,अजय साने, साईराज भालेकर, ऋषिकेश भालेकर
आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.