कर्करोगाच्या रुग्णांसाठी गुडन्यूज

PCB Admin
1 Min Read

कर्करोग, हा एक असा आजार आहे ज्याने जगभरातील लाखो लोकांचे आयुष्य प्रभावित केले आहे. या गंभीर आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान सतत प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, रशियाने एक मोठा दावा केला आहे ज्याने कर्करोगाच्या रुग्णांसाठीच नाही तर त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जगात कॅन्सरचा विळखा वाढत असताना हे संशोधन बहुमोल ठरले आहे.

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी कर्करोगाविरुद्ध एक प्रभावी लस विकसित केली आहे. ही लस 2025 च्या सुरुवातीला बाजारात आणण्यात येणार आहे. रशियातील कॅन्सर रुग्णांना ही लस मोफत देण्यात येणार आहे. परंतु जगभरात ही लस किती रुपयांना देण्यात येणार याविषयीची माहिती समोर आलेली नाही.

Share This Article