शहरातील पाणी,आरोग्य तसेच भटक्या कुत्र्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देणार – महापौर रवी लांडगे
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर व सत्तारूढ पक्षनेते यांची निवड अधिकृतरित्या आज जाहीर झाली. पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार महानगरपालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्षामध्ये करण्यात आला. या सत्कार प्रसंगी प्रिंट मीडिया, मेन स्ट्रीम मीडिया, डिजिटल मीडियातील पत्रकार उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे यांचा सत्कार जेष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी तर उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांचा सत्कार पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी यांनी केला. तसेच सत्तारूढ पक्ष नेते प्रशांत शितोळे यांचा सत्कार पत्रकार सुनिल उर्फ बाबू कांबळे यांनी केला.यावेळी माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले,जनता संपर्क विशेष अधिकारी श्री.किरण गायकवाड यांची ही प्रामुख्याने उपस्थिती पहायला मिळाली.
” एक स्वयंसेवक शहराचा महापौर झाला आहे.शहरातील नागरिकांच्या मूलभूल प्रश्नांना न्याय देणार असून,शहरातील पाणी,आरोग्य तसेच भटक्या कुत्र्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देणार असून,महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन करुन पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने सत्कार केल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार नवनिर्वाचित महापौर रवीभाऊ लांडगे यांनी मानले.
यावेळी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर, अमोल काकडे,मिलिंद कांबळे,विकास शिंदे,प्रकाश गायकर,प्रकाश यादव,संतोष मिश्रा, गणेश यादव,ज्ञानेश्वर भंडारे,प्रवीण शिर्के,मुकेश जाधव,अशोक लोखंडे,संतोष जराड,दिलीप देहाडे,दादाराव आढाव,देवा भालके,मारुती बाणेवार,रेहान सय्यद,शबनम सय्यद,विनय लोंढे, बद्रीनारायण घुगे,युनूस खतीब, गणेश शिंदे,अर्चना मेंगडे,श्रद्धा प्रभुणे,मंदा बनसोडे,राजश्री पवार,मुज्जफर इनामदार,संतोष गोतावळे,विकास गायकांबळे,शाम सोनवणे, अविनाश कांबीकर,जितेंद्र गवळी,अशोक कोकणे,निलेश सायंकर आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली ताई कुलकर्णी यांचा वाढदिवस महापौरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघांचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे यांनी तर आभार पत्रकार सुरज साळवे यांनी मानले.










































