शर्वरी विशाल कांबळे ‘Miss Pride of India 2026’ सौंदर्य स्पर्धेची विजेती

bpcauthor bpcauthor
1 Min Read

पि.चिं.भोसरी गव्हाणे वस्ती येथील मिस.शर्वरी विशाल कांबळे हिने आपल्या सौंदर्य, आत्मविश्वास आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर ‘Miss Pride of India 2026’ या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेचा किताब पटकावला आहे. ही भव्य स्पर्धा स्टारफेअर्स इव्हेंट्स, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री गणेश बॅन्क्वेट हॉल, सिंहगड रोड, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन ऑर्गनायझर पल्लवी मोरे माने यांनी अत्यंत उत्कृष्ट, नियोजनबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने केले. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अख्ख्या महाराष्ट्रातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा क्राउनिंग सोहळा सुप्रसिद्ध सिनेदर्शक अभिनेता आफताब शिवदासनी यांच्या हस्ते पार पडला. तसेच ‘लग्नाचा शॉट’ या मराठी चित्रपटाची संपूर्ण टीम आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर यांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रसिद्ध फॅशन ग्रूमर अनिल पाचंगे यांनी स्पर्धकांचे मार्गदर्शन केले. शर्वरीच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Share This Article