निगडी प्राधिकरण येथील वीणा संगीत विद्यालयाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त,

0
72

4 ऑक्टोबर 2025 रोजी *पद्मश्री पंडित एम. व्यंकटेशकुमार (धारवाड)* यांचा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या ‘मनोहर वाढोकर’ सभागृहात सायंकाळी ठीक 6:30 वाजता सुरू होत आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य प्रथमेश वेल्डिंग सोलुशन्स यांचे राहणार असून, सर्वांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या संचालिका डॉ. शर्वरी डिग्रजकर-पोफळे यांनी केले आहे.