समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याजवळ पैशाची बॅग, व्हिडीओ व्हायरल

PCB Admin
2 Min Read

दि . ११ ( पीसीबी ) – राज्याच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी, त्यांना आयकर विभागाची नोटीस आल्याचा दावा केला होता. दरम्यान, पैशांची बॅग शेजारी घेऊन बसले असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यासंदर्भात केलेला दावा खरा ठरल्याची चर्चादेखील रंगली आहे.

राऊत यांनी या व्हिडीओसंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना भाष्य केले होते. पैशांच्या बॅगेसह शिरसाट असल्याचा दावा राऊतांनी केला होता. दरम्यान, शिरसाटांचा हा व्हिडीओ समोर आला आहे. यानंतर शिरसाट यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले शिरसाट?

जो व्हिडीओ पाहत आहात तो माझ्या घरातील आहे. माझं बेडरूम आहे. बेडरूममध्ये मी बसलेलो आहे. बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे. व्हिडीओबद्दल मला आश्चर्य नाही, यात काही गैर नाही, टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक बॅग ठेवलेली आहे. एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? या बॅगमध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत, असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय.

संजय राऊतांनी आज ठरल्याप्रमाणे भुंकण्याचा काम केले. शिंदे साहेब दिल्लीला अमित शाह साहेबाला भेटले व त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा. परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं पाहिलं, तर यांना संताजी-धनाजी दिसतात का? असा प्रश्न आहे. मुर्खासारखे स्टेटमेंट दिसतात. सकाळी उठले का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला की एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे ..एवढचं संजय राऊत यांचं चालू आहे. गेलेली सत्ता त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अशा शब्दात राऊतांचाही शिरसाटांनी समाचार घेतला.

Share This Article