भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर, आर्थिक ठळ करणारा भोंदूबाबा पोलिसांच्या जाळ्यात

0
35

दि . २८ ( पीसीबी ) – हिडन मोबाईल अ‍ॅपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार (वय 29) असं या भोंदू बाबाचं नाव असून, तो स्वतःकडे ‘दिव्यशक्ती’ असल्याचा दावा करत अनेकांशी फसवणूक करत होता.

या प्रकरणी एका 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, या भोंदू बाबांना त्याच्याकडे दिव्यशक्ती असल्याच भासवत फिर्यादीला अनेक गोष्टी करण्यास भाग पाडले. या भोंदू बाबाने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एक हिडन ॲप डाऊनलोड करत त्याद्वारे मोबाईलचा ऍक्सेस मिळवला. फिर्यादी आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या घटनांवर लक्ष ठेवले. एवढेच नाही तर फिर्यादीला अश्लील कृत्य, त्याच बरोबर वेश्यागमन करण्यासही भाग पाडले आणि मोबाईल ॲपद्वारे ते पाहिल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आलं आहे. समावेश होता.
या भोंदू बाबाने आर्थिक फसवणूक केल्याचेही फिर्यादित सांगण्यात आलं आहे. फिर्यादी बरोबरच इतरही अनेकांची या भोंदू बाबाने फसवणूक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार याला अटक केली आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि वापरलेल्या अॅपची कसून चौकशी करण्यात आली आहे. भक्तांचे चित्रीकरण कोठे साठवले जात होते, याचा शोध घेण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या बाबांपासून सावध राहावे. कोणतीही अंधश्रद्धा ठेवू नये आणि आपली गोपनीय माहिती किंवा मोबाईल कोणालाही देऊ नये. तसेच, बाबाने फसवणूक केली असल्यास घाबरून न जाता समोर येऊन तक्रार द्या, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड
दरम्यान, पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात आज (२८ जून) पहाटे अज्ञात टोळक्याने 17 गाड्यांची तोडफोड केली. ही घटना सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडली. दारूच्या नशेत ही तोडफोड केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.