लग्नाला नकार दिला म्हणून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा छातीत चाकू भोसकून खून

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि . ४ ( पीसीबी )  – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीचा छातीत चाकू भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली. समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय 23) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून आरोपी प्रियकर सतीश यादव फरार झाला आहे. लग्नास नकार दिल्याने सतीशने समीक्षाशी वाद घालत तिच्या छातीत चाकूने भोकसून तिचा निर्घृण खून केला आणि तो फरार झाला. यावेळी सोबत असलेल्या मैत्रीणीने एका मित्राच्या मदतीने वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारापूर्वीच छातीत खोलवर वार झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार समीक्षा सतीशसोबत गेल्या सहा महिन्यांपासून लिव्ह इनमध्ये राहत होती. तेव्हापासून सतीशने तिला लग्नासाठी तगादा लावला होता. यामधून सातत्याने त्यांचा वादही होत होता. भाड्याच्या घरी सातत्याने वाद होत असल्याने घरमालकाने घर खाली करण्यास सांगितले होते. समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. आणि समीक्षा दोघंही सरनोबतवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. समीक्षा गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी सतीश यादव याच्यासोबत लिव्ह इनमध्ये होती.

दुकानात गेली, अन् तिथंच घात झाला
तेव्हापासून सतीशने सातत्याने लग्नाचा आग्रह धरला होता. चार वर्षांपूर्वी समीक्षाचं लग्न झालं होतं. मात्र ती कौटुंबिक वादामुळे पतीसोबत राहत नव्हती. प्रकरण न्यायालयात असल्याने तिने लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे सातत्याने समीक्षा आणि सतीशमध्ये वाद सुरू होते. याच वादातून समीक्षाला भाड्याची घर रिकामे करण्यास सुद्धा सांगण्यात आलं होतं. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून समीक्षा आईकडे बावड्यात राहत होती. मैत्रीणीसह ती सरनोबतवाडीमध्ये दुकानातून सामान आणण्यासाठी गाडीवरून गेली होती. यावेळी समीक्षाने सतीशला फोन केला.

अत्यंत निर्घृण पद्धतीने समीक्षाच्या छातीत चाकूने वार

यानंतर 15 मिनिटांनी सतीश सुद्धा त्याठिकाणी पोहोचला. सतीशने पुन्हा लग्नासाठी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी वाद आणखी वाढल्याने सतीशने अत्यंत निर्घृण पद्धतीने समीक्षाच्या छातीत चाकूने वार केले. छातीत खोलवर वार झाल्याने समीक्षा जागेवरच कोसळी. त्यानंतरही सतीशने तिच्यावर लाथांचा प्रहार केला आणि बाहेरून घराचा दरवाजा बंद करून तो फरार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या समीक्षाला मैत्रीणीने मित्राच्या मदतीने तातडीने खासगी रुग्णालयानंतर सीपीआरमध्ये उपचाचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

Share This Article