धनंजय मुंडेंच्या जागेवर या नेत्याची वर्णी लागरणार

bpcauthor bpcauthor
1 Min Read

दि . ४ ( पीसीबी ) – संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड आहे. शनिवारी सीआयडीने 1800 पानांच आरोपपत्र दाखल केलं. त्यातून सुद्धा हीच बाब समोर आली. वाल्मिक कराडच गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असल्याच समोर आलं. हा वाल्मिक कराड माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. हा गुन्हा घडला तेव्हापासूनच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. पण सरकारने राजीनामा घेतला नाही. काल संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करतानाचे फोटो समोर आले. अत्यंत क्रूरता या फोटोंमधून दिसून आली. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं सरकारला भाग होतं. त्यांनी तो घेतला.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्यामध्ये यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीत आता धनंजय मुंडे यांची जागा कोण घेणार याची राजकीय वर्तूळात चर्चा सुरू आहे.

डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. यानंतर छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती. आता धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ सक्षम पर्याय आहेत. त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.

Share This Article