संविधान गौरव अभियान प्रदेश समितीच्या महाराष्ट्र संयोजक पदी आमदार अमित गोरखे यांची निवड.

PCB Admin
1 Min Read

मुंबई, दि .7 (पीसीबी)- भारतीय जनता पार्टीतर्फे संविधान गौरव अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आमदार अमित गोरखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समितीमध्ये आमदार गोरखे यांच्यासह यांच्यासह सहसंयोजक धर्मपाल मेश्राम, शशीकांत कांबळे, कु. प्रेरणा होनराव आणि अमित घुगे यांचा समावेश आहे. यांची निवड नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार राष्ट्रीय अध्यक्ष, जे. पी. नड्डा यांना पाठविले आहे.
त्यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले, देशभर “संविधान गौरव अभियान” राबवणार अहोत. या अभियानात सर्व राज्यांच्या जिल्हा मुख्यालयात दौरे केले जाणार आहेत आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मूळ उद्देश हा
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचे महत्व जनमानसात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांना राष्ट्र विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे हाच आहे.

Share This Article