श्रीमंत कलाकारांच्या यादीत कपिल शर्मा, ३०० कोटींचा मालक

0
51

मुंबई, दि. 22 (पीसीबी) : टीव्ही असो वा सिनेसृष्टी, स्टार्सच्या संपत्तीबद्दलची चर्चा नेहमीच रंगते. सिनेसृष्टीत शाहरुख खान सर्वांत श्रीमंत व देखणा अभिनेता मानला जातो. मात्र, टीव्ही इंडस्ट्रीसंदर्भात बोलायचं झालं, तर ‘अनुपमा’फेम रूपाली गांगुली आणि ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’फेम दिलीप जोशी ऊर्फ जेठालाल यांची नेहमीच चर्चा होते. या दोघांनाही मोठ्या कमाईसाठी ओळखलं जातं. पण, नव्या आकडेवारीनुसार, टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत कलाकारांच्या यादीत कपिल शर्मा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानं इतर टीव्ही कलाकारांनाही मागे टाकलं आहे.

होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं. कॉमेडियन कपिल शर्मा हा टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत कलाकार ठरला आहे. ’मनी कंट्रोल’च्या अहवालानुसार, कपिल शर्मा आपल्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी मोठी रक्कम घेतो. या अहवालात सांगितलं आहे की, कपिल त्याच्या कॉमेडी ओटीटी शोसाठी एका एपिसोडसाठी तब्बल पाच कोटी रुपये घेतो. डीएनए, फर्स्टपोस्ट आणि इतर ऑनलाइन पोर्टल्सच्या मते, कपिल शर्माची एकूण संपत्ती ३०० कोटी रुपयांपर्यंत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वांत श्रीमंत कलाकारांच्या यादीत कपिल आता टॉपवर आहे.